/, Love/ताऱ्यांची साक्ष

ताऱ्यांची साक्ष

By |2020-02-11T11:05:41+00:00February 11th, 2020|Inspiring Story, Love|

ताऱ्यांची साक्ष
काळीभोर रात्र त्यात चंद्र चांदण्याची मैफिलित नुकतेच लग्न झालेलं जोडफ आपल्या आयुष्यातल्या जोडीदाराशी पहिल्यांदाच मोकळी न शांत भेटत होते.. पूर्वी झालेलं बोलणं हे दूरध्वनी वरूनच स्वरा आणि माधव दोघांनी आई बाबा च्या मर्जीने लग्न म्हणजेच अरेंज मैरिज केलें होते तरी सध्या फार कमी आहेत अशी जुळणारी मन सगळ्यांना इंडिपेंडंट जगायचं असत त्या जगापासून थोडे वेगळे होते हे दोघे.. तरी दोघांच वय अठ्ठावीसच्या घरात असल्याने पहिल्या प्रेमाची गोष्ट दोघांच्या मनात भीती करून होती
स्वरा सुदंर निर्मळ पेशाने अभियंता होती माधवही उंच गोरा पेशाने तोही अभियंता होता अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा कुणालाही हेवा वाटावा असा…त्या झगमगत्या आकाशात एक चंद्र आणि माधवच्या समोर एक चंद्रासारख रूपवान स्वरा त्यात नववधू चा हळदीची होळी खेळलेले अंग आणि मंगळसूत्र न कुंकवाचा चुड्याचा साज माधवांची नजर हतट न्हवती..तरी समोरा समोर लग्नाआधी भेट झाली न्हवती दोघांची तरी साखरभीतीला जपत माधवाने हात स्वराच्या हातावर ठेवला..माधवतल्या साखरभीतिचा स्पर्श जणू स्वरांच्या मनाला झाला तिचेही ठोके वाढले न माधवला वाढलेल्या ठोक्याची जाणं झाली तेवढ्यात तो म्हणाला घाबरु नकोस आयुष्य असच घालवायच आपल्याला..लाजून स्वराची नजर झुकून गेली..माधव ने आज ठरवलेलं स्वराला सगळं खर सांगायचं प्रेमाचा स्पर्श त्याला या आधीही झाला होता ठरवल्या प्रमाणे त्याने स्वराला सगळं खरं हळूहळू सांगितले..स्वरा मनाने न विचारने निर्मळ मुलगी होती तिने माधवचा भूतकाळ स्वीकारून पण काळाच्या खेळाची प्यादी ही स्वरा सुद्दा होती तिचाही भूतकाळ होता…माधव प्रेमाने तिनेही घाबरलेल्या मनातले सत्य त्याला सांगून टाकले…माधवाचे मन मात्र विचारात गुंफत होत त्याच्या पुरुषीय विचारांनी त्याला सत्य स्वीकारता येत न्हवतं स्वराबाबतीत त्याच मत वेगळे होते तिच्या धार्मिक ओढीने आई बाबांवर अपार प्रेमाने तिच कुणावर प्रेमही असेल ह्याचा विचार माधवला पूर्वी आलाच न्हवता पण तरी आता ऐकून त्याला न पचणारे तिचे शब्द त्याच्या चेहऱ्यावरच्या आकृत्या सांगत होत्या..स्वराला सुद्दा भिती वाटत होती पण झालेलं माधव आणि स्वराला सोडणं भाग होत एक नवी सुरुवात त्याची वाट बघत होती..माधवने स्वराला मिठीत घेतले तिच्या डोळ्यातल्या भीतीने आता अश्रूंचा आधार घेतला होता…माधवने तिला शांत केले न त्याच क्षणात दोघे मावळून गेले…माधवने तिचे अश्रू पुसत तिला आधार दिला ह्या रात्रीत आयुष्याची स्वप्न रंगवत होते आता त्या रात्री आकाशातले असंख्य तारे स्वरा आणि माधव ह्यांच्या गोड क्षणाची साक्ष होती…

0

About the Author:

Leave A Comment

seventeen − 16 =