/, Uncategorized/“दृष्टिकोन”

“दृष्टिकोन”

By |2020-02-06T05:58:51+00:00February 6th, 2020|People, Uncategorized|

“अरे देवा, आला हा परत.”, “अरे देवा, नेमका कुठे बाहेर निघायच्या वेळेलाच हा पाऊस कसा येतो.”, “ऊन किती वाढलंय, कुठे बाहेरही जात येत नाही.” असे शब्द अलगद आपल्या ओठातून निघतात. अशा अनेक तक्रारी बऱ्याचदा आपण नकळत स्वतः कडेच करत असतो.
एकदा असाच मी हि तक्रार करत घरा बाहेर निघालो, इतक्या भर पावसात. सकाळ सकाळ ऑफिस ला जाण्याची वेळ, त्यात पाऊस पडतोय, ऑफिस ला जायला उशीर होतोय म्हणून मी पूर्ण वैतागलो होतो. तेवढ्यात, तिथे एक लहान मुलगा दिसला, अंदाजे ४-५ वर्ष वय असेल त्या लहान मुलाचं. तो त्याच्या आजी सोबत उभा होता. पाऊस सुरु होताच त्या लहान मुलाच्या त्या निरागस डोळ्यातील आनंद गगनात मावेना. अक्षरश, त्या छोट्याश्या मुलाने, आपल्या आजी चा हाथ सोडून आडोश्याच्या बाहेर उडी मारली, आणि पावसात भिजण्याचा यथेच्छ आनंद घेऊ लागला. त्या लहान मुलाला पाहून माझा वैतागलेला चेहऱ्यावर सुद्धा अलगद हसू आलं. त्या लहान मुलाचं ते निरागस वागणं, त्या पावसात त्याच मनमोकळे पणा ने भिजणं. मला थोडं चकित करून गेलं. कारण, ज्या पावसाला लोक वैतागले आहेत, अर्थात मी हि वैतागलो होतो. पाऊस थांबन्याची अपेक्षा करत होतो. त्याच पावसात हा छोटासा मुलगा इतक्या आनंदात पावसात भिजत कसा होता?
हि गोष्ट खरंच विचार करण्या सारखीच आहे. कि, पाऊस तर एकचं होता, ती जागा हि एकचं होती, जिथे पाऊस पडत होता. मग तिथल्या लोकांचे विचार वेगळे कसे? लोकांची वृत्ती इतकी वेगळी कशी?
तेंव्हा मला जाणवले कि, प्रत्येक माणसाच्या कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. जसे की, हेच उदाहरण घ्या. त्या पावसामध्ये आपल्याला फक्त त्या पावसामुळे होणारा त्रास दिसला. पण त्या लहानश्या मुलाच्या त्याच पावसामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
म्हणूनच कुठलीही गोष्ट करताना, कायम त्यामधली सकारात्मक बाजू पाहावी. जीवनात दुःख, त्रास, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा राग नक्की असतोच. म्हणून काय आपण या सुंदर दुनियेतल्या गोष्टींचा आनंद घेन सोडायचं का? म्हणूनच, जीवनात कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा.

0

About the Author:

Leave A Comment

19 − 8 =