विचार करायला भाग पाडेल, अस काही आज झाल…। 😊
मी माझ्याच विचारात बस स्टॉप वर उभा होतो. बस आली मी बस मध्ये चढलो. माझ्या पाठोपाठ एक खुप वय्सक आजी आजोबा ही बस मध्ये चढले. बस तर एकदम गच्च भरलेली, गर्दी…।।
तेवढ्यात एक सीट रिकामी झाली, तर लोकांनी त्या आजीला बसायला सांगितले. पण ती आजी स्वतः न बसता आजोबांना बसायला सांगत होती.
तर आजोबा बोलत होते. बस तु, दमली आहेस.
आजी बोलत होती. मला काय करायचंय बसुन, तु बस आधीच तुझं तंगडं मोडलयं…।। आता ऊगाच नाटकं नको करु म्हतार्या…।। 😁😁
आजोबा बोलत होते. मला म्हतारा बोलतेयस, जसं तु अप्सराच ना…।। 😂
ऐकून इतक हसू येत होत, की सांगु नाही शकत…।। 😁😁
खुप वेळ झाला तरी ते दोघे भांडत होते, पण कोणी बसलं नाही त्या सीट वर… नंतर अजून एक सीट रिकामी झाली, तेव्हा कुठे ते दोघे बसले….।।
नंतर माझा स्टॉप आला, मी उतरलो…।।
पण एक विचार करत होतो. की, खरचं जीवन इतकं सुंदर आहे..।। त्या ७०-७५ वर्षा च्या आजी आजोबांनी खरचं जीवनाचा अर्थ किती सहज समजावला..।।
त्यांच ते भांडण, लोकांना फक्त तेवढंच दिसलं. पण, त्यांच्या भांडणात प्रेम किती होतं हा विचारही नसेल केला कोणी…।। 😊
बस, आज एक समजलं, आपण कुठल्याही गोष्टीची कायम फक्त तक्रारचं करतो, पण जर त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. तर खरचं जीवन सुंदर होईल…।। ☺☺
You need to login in order to vote
Leave A Comment