/, Inspiring Story/IAS… ध्येय वेडा प्रवास…

IAS… ध्येय वेडा प्रवास…

By |2020-02-19T12:21:24+00:00February 15th, 2020|Education, Inspiring Story|

       19 मे 2001 चा तो दिवस…. एक सामान्य कुटुंबात मी जन्म घेतला, पण त्यांना अपेक्षा असते ती एक वंशाच्या दिव्याची. एक आई वडिलांसाठी तर त्यांचं मुल हे त्यांना प्रियच असत तसचं माझ्या आई वडिलांना सुध्दा माझ्या जन्माची काही अडचण नव्हती. पण ते म्हणतात ना आपल्या देशाचं एक दुर्दैव आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा धिक्कार करते. तसचं काहीतरी माझ्या बाबतीत घडल. माझ्या आजीला माझा जन्म मान्य नव्हता कारण तिला नातू हवा होता. म्हणुन माझ्या जन्म नाकारला गेला. आजही मला म्हटलं जातं तू एक्स्ट्रा जन्माला आली आहे कारण मला अजुन एक मोठी ताई आहे. म्हणून माझ्या जन्माची कथा सुरु होते ती एक दुसरी मुलगी झाली म्हणून तिचा जन्म नाकारला गेला तेव्हा पासून……
        जन्म झाला त्या नंतर माझ्या आजीला दवाखान्यातील परीचारिकेने देखील समजावलं की इतकी गोड मुलगी आहे तरी तुम्ही अस का वागतात. माझ्या आईला देखील कोरडी पोळी खायला लागली. का? तर फक्त त्या मातेने एक मुलीला जन्म दिला. त्या नंतर सगळ सुरळीत चालू होत.आई वडिलांनी माझ्या हौस मौज सगळ पूर्ण करण्याचा प्रयत्न परिस्थिती नसताना देखील केला. त्यांनी कधी भेदभाव केला नाही आणि आजही माझे आई वडील मला त्याच उम्मिदीने शिकवता आहेत. लहान होते तेव्हा खूप मजा केली कारण तेव्हा अजुन जग बघितलेले नव्हत तेव्हा वाटायचं जगणं खुप सोप आहे .पण जगण्याची स्पर्धा समजली जेव्हा हळू हळू मोठी होत गेले. मुलीने कसं, राहावं कसं, बोलावं कसं चालव हे जेव्हा लोक सांगायला लागले तेव्हा वाटायचं हे अस कुठे जगणं असत का? आणि हे बंधन फक्तं आम्हालाच का? म्हणजे मुलगा रस्त्या वर उभा राहून मुली छेडेल, शिट्ट्या मारेल आता तर इतकं की बलात्कार ही करेल ते ह्या समजाला मान्य असत पण मुलगी मुलाशी नुसती बोलली तरी ते मान्य नसत आणि तिला सरळ चारित्र्यहीन म्हटलं जातं.मी तशी अभ्यासात हुषार होते तशीच इतर कलांमध्ये सुध्दा मला आवड होती. मी आधी पासूनच जगले ते स्वतःला शोधण्यासाठी ना की लोकांनी जी बंधने लाऊन दिली आहेत त्यांचा वारसा पुढे जपण्यासाठी. आणि मी तेव्हा आठवीच्या वर्गात असताना स्वप्न बघितल ते म्हणजे IAS होण्याचं. आणि तेव्हा पासून मी स्वतःच्या पाय वर उभे राहण्याच्या प्रयत्न करू लागले. पण ते ह्या समाजाला कधी मान्यच झालं नाही. आजही मला माझ्या आधुनिक विचारानं बद्दल नको ते बोलले जाते.पण मी एकच विचाराने जगते,आपण काही वाईट करत नाही आहोत तर मग कोणाला का घाबरायच. आणि बाहेरच्या लोकांपेक्षा तर आपल्या लोकांनीच छळायचा जास्त प्रयत्न केला आणि अजूनही करतात.पण ते म्हणतात ना आपण कोणासोबत वाईट न नाही केलं तर आपल सुध्दा चांगलं होत.संघर्ष आहे पण त्या मधून काही सकारात्मक विचार मी केला.
मी शाळेत असताना माझ्या ताई ने लव्ह मॅरेज केलं त्या मुळे मला जास्तच बोलले जाऊ लागले. मी शब्दात व्यक्त करू शकतं नाही अशा त्या आठवणी आहेत. पण तरी मी माझी जिद्द सोडली नाही. खूप अडचणी आल्या खुप लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या लढाई मध्ये कोणीच सोबत नव्हत. आई वडील होते ते कालांतराने काही लोकांचं ऐकून माझ्या बाजूने उभे राहत नव्हते. कधी कधी लग्न करून टाका मुलगी शिकुन काय करणार आहे. शेवटी धुन-भांडेच करायचे आहे हे वाक्य आमच्या घरात येऊनही बोलायला कमी करत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खुप नकारात्मक परिणाम झाला. दहावीला मला ८६% टक्के होते आणि बारावीत मला ६०% आले. तेव्हाही लोक बोलले हुषार होती ना ही तर मग इतके कमी टक्के.पण मी होती की नकारात्मक लोकांचं नकारात्मक बोलण कधी मनावर घ्यायची नाही. उलट ह्यांच्या बोलण्यातून मला जास्त हिम्मत यायची कारण जी लोक आपल्या बाजूने आहे त्यांना तर माहिती असत आपण हे करू शकतो पण अशा लोकांमुळे हिम्मत येते की नाही काही तरी करून दाखवायचं. अशा काळात कोणी सोबत नव्हत. म्हणून मन दुसरी कडे वळल प्रेम झालं पण म्हणतात ना प्रेम आंधळ असत आणि कोणीही फक्तं फायद्यासाठी सोबत असत तसचं काही तरी माझ्या सोबत घडलं.
नंतर बारावी नंतर मी UPSC साठी पुणे ला जायचा निर्णय घेतला. मी खूप प्रयत्नानंतर तिकडे गेले.तिकडे जाऊन इकडे साधी राहणारी मुलगी मॉडर्न रहायला लागली हे काही लोकांना सहन होत नव्हत. पण तरी मी माझ्या मतावर ठाम आहे, स्वतः वर विश्वास आहे की काहीही झालं तरी एक दिवस हे नाव पडणारेच आपल्या यशावर टाळ्या वाजवतील. मग घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या मुळे पुण्यात मला खूप अडचणी येऊ लागल्या. नंतर मी शिकताना नोकरी करण्याचा निर्णय घेतला. अथक प्रयत्नानंतर मला एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरी मिळाली. सगळ काही सुरळीत चालू होत. मी खूप मेहनत घेतली. 8 तास नोकरी करून मग क्लास करायचे आणि मग नंतर अभ्यास. पण परत ते म्हणतात ना दुसऱ्याच चांगलं झालं की पोटात दुखत तस काहीतरी परत माझ्या बाबतीत घडल. माझ्या वर नको तर आरोप करून, मला नोकरी चांगल्या मार्गाने मिळालेली नाही, मी तेव्हा ICU मध्ये होते.मग मला परत जळगांवला आण्यात आल.सगळ काही आर्ध्यातून संपल होत. IAS ध्येय तर होताच. कितीही संकट आली तरी मी ते सोडल नव्हत मग आता तरी मी ते कसं सोडू शकणार होते. मी परत लगेच तिसऱ्या दिवसानंतर लगेच पुस्तकं हातात घेतलं परत अभ्यासला लागले. विश्वास होता प्रयत्न केले तर निश्चतच काहींना काही मार्ग असतोच. आणि जिथं अस वाटत की सगळ काही संपले तिथं नवीन मार्ग असतोच.तसचं मला देखील नवीन मार्ग भेटला. byju’s कडून मला स्कॉलरशिप भेटली आणि मला नवीन आशा भेटली आणि परत IAS से ध्येय घेऊन मी पुन्हा माझा प्रवास चालू केला. अजूनही एक मुलगी म्हणून जगताना मला खूप अडचणी येत आहेत पण ध्येय अस आहे की हे सगळ त्या पुढे शुल्लक आहे. आजही तो ध्येय वेडा प्रवास चालू आहे. आजही दिवस रात्र पुस्तकांवर प्रेम करण चालू आहे आणि नक्कीच एक दिवस हा प्रवास पूर्ण होईल.
आणि भारतात IAS चंचल धांडे हे नाव नक्कीच ऐकायला मिळेल. हा प्रवास नक्कीच एका सकारात्मक दिशेने समाजात बदल घडवून आणण्यासाठी नक्कीच यशस्वी ठरेल.

0

About the Author:

Leave A Comment

5 + 7 =